स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा संरक्षण मंत्र्याकडून लष्कराला सुपूर्द

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी काल नवी दिल्लीमध्ये स्वदेशी बनावटीची शस्त्रास्त्र आणि यंत्रणा भारतीय लष्कराला सुपूर्द केली. फ्युचर इन्फंट्री सोल्जर तसंच अत्यधुनिक अँटी पर्सोनेल माइन, रणगाड्यांसाठी अपग्रेडेड साईट सिस्टीम, हाय मोबिलिटी इन्फंट्री प्रोटेक्टेड व्हेईकल्स आणि असॉल्ट बोट्स या अत्याधुनिक उपकरणांचा यात समावेश आहे. या उपकरणामुळे भारतीय सैन्याच्या कार्यक्षमतेत वाढ होईल असा विश्वास राजनाथ सिंह यांनी यावेळी व्यक्त केला. आत्मनिर्भर भारत अभियाना अंतर्गत सशस्त्र दलांचे अधुनिकीकरण करण्याच्या उद्देशानं संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं ही शस्त्रास्त्र आणि यंत्रणा विकसित केली आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image