सिक्कीमच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट

 

मुंबई : सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेम सिंह तमांग (गोले) यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत सिक्कीमचे पर्यटनमंत्री बेदू सिंग पंथ हे देखील उपस्थित होते. तमांग यांनी राज्यपालांना सिक्कीमच्या प्रसिद्ध थांका चित्रशैलीचे पेंटिंग भेट दिले.