१६ आमदारांच्या अपात्रतेसह विविध याचिकांवर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : १६ आमदारांच्या अपात्रतेसह शिवसेनेच्या शिंदे तसंच ठाकरे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार होती, ही सुनावणी आता परवा तीन ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमणा, न्यायमूर्ती कृष्णा मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या खंडपीठासमोर आज ही सुनावणी होणार होती, मात्र आजच्या कामकाज तालिकेमध्ये या याचिकांचा समावेश केलेला नाही, त्यामुळे ही सुनावणी तीन ऑगस्टला होणार आहे.