लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे अभिवादन

 

मुंबई : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

साहित्यरत्न, लोकशाहीर तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनीही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून वंदन केले.