नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायमूर्ती उदय उमेश लळित यांचा भारताचे एकोणपन्नासावे सरन्यायाधीश म्हणून आज शपथविधी झाला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी त्यांना पदाची शपथ दिली. यावेळी उपराष्ट्रपती जगदीश धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि इतर केंद्रीय मंत्री उपस्थित होते.
न्यायमूर्ती उदय लळित यांचा कार्यकाळ ८ नोव्हेंबर पर्यंत राहील. वर्तमान सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन.व्ही. रमणा काल निवृत्त झाले. लळित यांनी यापूर्वी तिहेरी तलाक सारख्या महत्वाच्या विषयांवरील निर्णयप्रक्रियेत भाग घेतला होता आणि सरन्यायाधीश म्हणूनही काही मुख्य सुनावणींची हाताळणी ते करणार आहेत.
SR. NO.9/9, MAHATMA PHULE ROAD, MALI ALI, NEAR OLD MAHADEV TEMPLE, BHOSARI, DIST-PUNE-411039, MAHARASHTRA
About
भारत सरकार मान्यता प्राप्त व महाराष्ट्रातून नियमित प्रकाशित होणारे साप्ताहिक एकच ध्येय वृत्तपत्र आहे. सामाजिक बांधिलकीतून व नागरिकांच्या अडी-अडचणी तसेच शासन व प्रशासनाच्या नागरिकांच्या कल्याणासाठी असणाऱ्या बातम्या, आमच्या वृत्तपत्रातून व www.ekachdhyeya.com या वेबसाईटवर नियमित प्रकाशित करत आहोत.