जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांची चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर टीका

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जपानचे प्रधानमंत्री फुमियो किशिदा यांनी चीनचा युद्धसराव आणि क्षेपणास्त्र डागण्याच्या कृतीवर सडकून टीका केली असून हे प्रकार तात्काळ थांबवावेत अशी सूचना केली आहे. ते अमेरिकेच्या नेत्या नॅन्सी पेलोसी यांच्यासोबत झालेल्या मुलाखतीदरम्यान बोलत होते. 

पेलोसी यांनी केलेल्या तैवानच्या दौऱ्याविरुद्ध प्रतिक्रिया म्हणून चीन हा युद्धसराव करत आहे. चीननं डागलेली ५ क्षेपणास्त्र जपानच्या आर्थिक क्षेत्रात पडली असल्याचंही जपाननं काल म्हटलं होतं. मात्र चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते हुआ चुनयिंग यांनी जपानच्या या आरोपांचं खंडन केलं असून चीन आणि जपाननं अद्याप आपापल्या सागरी जलक्षेत्र सीमा निश्चित केल्या नसल्याचं म्हटलं आहे.