डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृतीसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थे (बार्टी) मार्फत एमफिल व पीएचडी करण्यासाठी देण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी अनुसूचित जातीतील संशोधक विद्यार्थांना २५ सप्टेंबर २०२२ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी विद्यार्थी अनुसूचित जातीतील महाराष्ट्रातील रहिवासी असावा. एमफिल, पीएचडीसाठी १ जून २०२१ ते ३१ डिसेंबर २०२१ या कालावधीत कायमस्वरुपी नोंदणी असावी. विज्ञान व तंत्रज्ञान विषयामध्ये नामांकित विद्यापीठामध्ये पीएचडी करू इच्छिणाऱ्या परंतु नोंदणी न झालेल्या संशोधक विद्यार्थ्यांना ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती-२०२१ साठी २५ ऑगस्ट रोजी https://barti.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्राच्या साक्षांकित प्रतीसह भरलेल्या अर्जाची प्रत बार्टी, २८, क्वीन्स गार्डन, कॅम्प, पुणे या पत्त्यावर ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पाठवावी किंवा प्रत्यक्ष येऊन सादर करावी.

याबाबत परिपूर्ण माहिती, मार्गदर्शक तत्वे, सूचना बार्टीच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असल्याची माहिती बार्टीच्या योजना विभागाचे उमेश सोनावणे यांनी दिली आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image