नीरज चोप्रानं लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत रचला इतिहास

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : टोकियो ऑलिम्पिक्समधे भालाफेकीत सुवर्णपदक पटकावलेल्या नीरज चोप्रानं प्रतिष्ठेची लुसान डायमंड लीग स्पर्धा जिंकत इतिहास रचला आहे. ८९ पूर्णांक ०८ मीटर लांब भाला फेकत अजिंक्यपद मिळवलं. या स्पर्धेत अजिंक्य ठरलेला तो पहिला भारतीय आहे. या कामगिरीमुळे तो २०२३ च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. 

केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी नीरजचं ट्विटरवरून अभिनंदन केलं आहे.  कोणाचं लक्ष नसताना त्यानं तयारी केली, नियोजन केलं आणि मेहनतीचं फळ त्याला मिळालं, असं ठाकूर म्हणाले.