एक संकल्प एक लक्ष्य हे ध्येय ठेवून भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रिडा स्पर्धेत उत्तम कामगिरी केली - प्रधानमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सर्व भारतीय खेळाडूंशी दिल्ली इथं संवाद साधला. त्यांना संबोधित करतांना प्रधानमंत्री म्हणाले की, सर्व खेळाडूंनी आत्मविश्वासाने, मेहनतीने आणि जिद्दीने आपल्या खेळाद्वारे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत छाप सोडली आहे यासाठी जे पदक विजेते आहेत त्यांचे आणि भविष्यातील पदक विजेत्यांचे मी अभिनंदन करतो. प्रधानमंत्री पुढे म्हणाले की सर्व खेळाडू देशाची संपदा असून त्यांना  प्रोत्साहन देण्यासाठी सर्व नागरिक त्यांच्या पाठीशी आहेत. एक संकल्प एक लक्ष्य हेच ध्येय ठेवून तुम्ही एकुण ६१ पदकं जिंकुन राष्ट्राची मान उंचावली. एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला सशक्त केलं असल्याचंही प्रधानमंत्री म्हणाले.

आज अनेक राष्ट्रे भारताकडे आदर्श म्हणून बघतात. आपल्या तिरंग्याची ताकद युक्रेन मध्ये बघायला मिळाली असून भारताचा सुवर्ण काळ जवळ आल्याचे  ते म्हणाले. ते म्हणाले की देशाचा अमृत काल सुरु झाला असून भारत क्रिडा क्षेत्रात नवीन खेळांवर ही आपली छाप सोडेल. तरूणांमध्ये क्रिडा रूची वाढवण्यावर त्यांनी भर दिला तसचं दूर - सर्व क्षेत्रांपर्यंत खेळ पोहचायला हवे अस प्रधानमंत्री म्हणाले.