मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्‍वेषण ब्यूरो अर्थात  सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी के सक्सेना यांनी या प्रकरणी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल सीबीआय चौकशीची शिफारस केली होती.

दरम्यान या प्रकरणातली सत्यता लवकरात लवकर बाहेर यावं म्हणून आपण सीबीआयला पूर्ण सहकार्य करणार असल्याचं मनीष सिसोदिया यांनी म्हटलं आहे. आतापर्यंत आपल्यावर अनेक आरोप झाले मात्र त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही असंही त्यांनी सांगितलं.

तर कुणी कितीही निर्दोष असल्याचा दावा केला तरी भ्रष्टाचारी हा भ्रष्टाचारी असतो. दिल्लीतल्या आप सरकारकडून झालेला हा पहिलाच भ्रष्टाचार नाही. मद्यविक्रीतही मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला.