भारत बायोटेकच्या नाकावाटे घ्यायच्या लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत बायोटेक या लस उत्पादक कंपनीने बनवलेल्या नाकावाटे घेण्याच्या कोविडप्रतिबंधक लशीच्या चाचणीचा तिसरा टप्पा पूर्ण झाला असून वर्धक मात्राही तयार झाली आहे. या चाचणीतला पाहणी अहवाल राष्ट्रीय नियामक प्राधिकरणाकडे सादर केला असल्याचं कंपनीने सांगितलं. 

BBV154 ही लस नाकावाटे घेतल्यावर श्वसनमार्गाच्या वरच्या भागातच कोविड संसर्गाला प्रतिरोध करणाऱ्या अँटीबॉडीज तयार होतील असं कंपनीने म्हटलं आहे.