कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ ; बचत खात्याशी आधारजोडणी करावी

 

पुणे : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत २०१७-१८, १०१८-१९ तसेच २०१९-२० या कालावधीत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मान्यता देण्यात आली आहे. लाभाची रक्कम पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये जमा करण्यासाठी शेतकऱ्यांनी बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी केले आहे.

शेतकऱ्यांनी या तीन वर्षात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची बँकेच्या मंजूर धोरणानुसार विहित मुदतीत परतफेड केली आहे, अशा शेतकऱ्यांना त्यांनी सदर कालावधीत घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये ५० हजारापर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांनी घेतलेल्या व त्याची पूर्णतः परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम २०१८-१९ अथवा २०१९-२० या वर्षात ५० हजार रुपयांपेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेइतका प्रोत्साहन पर लाभ देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी बचत खात्याला आधार क्रमांक जोडणी आवश्यक आहे. आधार कार्ड नाहीत अशा पात्र शेतकऱ्यांनी तात्काळ ‘आपले सरकार सेवा’ केंद्रामध्ये जाऊन आधार कार्ड काढावे व ते आपल्या बँकेच्या बचत खात्यास जोडणी करावे. तसेच आधार कार्ड बचत खात्यास जोडलेले नाही त्यांनीही बँकेच्या शाखेत संपर्क साधून आपल्या बँक खात्याशी आधार कार्ड जोडणी करावी, असे आवाहन पुणे ग्रामीणचे जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था मिलिंद सोबले यांनी केले आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image