प्रधानमंत्री उद्या नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या नवी दिल्लीत राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात नीती आयोगाच्या प्रशासकीय परिषदेच्या सातव्या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. या बैठकीत केंद्राचं राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसोबतचं सहकार्य आणि समन्वय वाढवण्याबाबत चर्चा केली जाईल.

पिकांचं विविधीकरण तसंच तेलबिया, डाळी आणि इतर कृषी उत्पादनात स्वयंपूर्णतेबरोबरच राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी आणि नागरी प्रशासन या विषयांवर सुद्धा चर्चा होणार आहे.

या प्रशासकीय परिषदेत सर्व विषयांच्या कार्यपद्धती आणि कार्यवाहीला अंतिम स्वरूप देण्यात येणार आहे. या बैठकीच्या पूर्वतयारीसाठी गेल्या जून महिन्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली धर्मशाळा इथं मुख्य सचिवांच्या  राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं होत.