एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना बॅच बदलण्याचा पर्याय देणार – उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

 

मुंबई : एमपीएससी आणि बीएड सीईटी परीक्षा एकाच दिवशी दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून दोन्ही परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षांसाठी बॅच बदलण्याचा पर्याय देण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे विधानपरिषदेत व विधानसभेत केले.

सीईटी कक्षामार्फत बीएड (B.Ed.) व बीएचएमसीटी या दोन विषयाची परीक्षा दि. 21 ऑगस्ट 2022 रोजी होणार असून, जे उमेदवार या परीक्षांबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेस बसलेले असतील त्यांनी याबाबत त्वरित सीईटी कक्षास ई-मेलद्वारे कळवावे, जेणेकरून त्यांना सीईटीमार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी बॅच बदलून देण्याची कार्यवाही करता येईल. या उमेदवारांनी maharashtra.cetcell@gmail.com या ई-मेलवर तात्काळ पत्रव्यवहार करावा, असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.

Popular posts
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image