ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांची कॉंग्रेसला सोडचिठ्ठी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी आज पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. पक्षात आपल्याला डावललं जात असून महत्त्वाचे सर्व निर्णय राहुल गांधी आणि त्यांच्या जवळच्या वर्तुळातले लोक घेत असल्यामुळे आपण राजीनामा देत असल्याचं आझाद यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना लिहीलेल्या पत्रात म्हटलं आहे.

आझाद यांनी या महिन्याच्या सुरुवातीसच जम्मू काश्मीर प्रचार समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आता त्यांनी पक्षातल्या सर्व पदांच्या जबाबदाऱ्यांमधून मुक्त करण्याची विनंती सोनिया गांधी यांना केली आहे.