भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात ३ पोलिसांचं निलंबन

 

मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात अल्पकालिन चर्चा झाली. यावेळी बोलताना विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी, ही घटना पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी असल्याचं म्हटलं. महिलांच्या सुरक्षेसाठी राज्यात शक्ती कायदा लागू करण्यासाठी राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.