पीएचडी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीत मुदतवाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापीठाच्या पेट अर्थात पीएचडी प्रवेश परीक्षेच्या ऑनलाईन नोंदणीला मुदतवाढ दिली गेली आहे. त्यामुळे या परीक्षेसाठीचे अर्ज आता ऑनलाईन पद्दतीनं येत्या १७ ऑगस्ट २०२२ पर्यंत दाखल करता येतील, अशी माहिती विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉक्टर विनोद पाटील यांनी दिली.

जुलै महिन्यात २९ तारखेला अर्ज दाखल करायला सुरुवात झाल्यापासून आत्तापर्यंत ३ हजार ३८८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले, त्यात विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्याशाखेसाठी सर्वाधीक १ हजार ४९८ अर्ज प्राप्त झाले असल्याचं पाटील यांनी सांगितलं.

अर्जविषयक प्रक्रिया संपल्यानंतर चारही विद्याशाखांसाठीच्या एकूण ७९ विषयांसाठीची ही  परीक्षा याच म्हणजेच ऑगस्ट २०२२ पर्यंत घेण्याचं विद्यापीठाचं नियोजन आहे, तसं वेळापत्रक लवकरच जाहीर केलं जाईल अशी माहिती पाटील यांनी दिली.