राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ते २५ ऑगस्ट होणार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या १७ ऑगस्टपासून मुंबईत होणार आहे. या अधिवेशनाचा कालावधी १७ ते २५ ऑगस्टपर्यंत निश्चित करण्यात आला आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते. अधिवेशन कालावधीत २४ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन केलं जाणार आहे.

Popular posts
विधानभवनाच्या प्रवेशद्वारावरच्या पायऱ्यांवर आंदोलन करायला, आणि प्रसारमाध्यमांनी तिथे चित्रीकरण करायला बंदी घालावी - जयंत पाटील
Image
महाराष्ट्र वस्तू आणि सेवा कर सुधारणा विधेयकाला विधानसभेत मंजुरी
Image
शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी कृषी व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या पदवीधरांनी काम करावं- केंद्रीय कृषीमंत्री
Image
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लशींच्या 122 कोटींचा टप्पा ओंलाडला
Image
राज्यात आतापर्यंत ६४ लाख ५६ हजार ९३९ जणांना कोरोनाची लागण
Image