पत्रा चाळ प्रकरणी संजय राऊत यांच्या कोठडीत ४ दिवस वाढ

 

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या ईडी कोठडीत आणखी चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. विशेष न्यायालयाने आज राऊत यांना ८ ऑगस्टपर्यंत कोठडी दिली.

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी अटक केली होती. त्यानंतर पीएमएलए न्यायालयानं त्यांना आजपर्यंत सक्तवसुली संचालनालयाच्या ताब्यात ठेवण्याचा आदेश. ही कोठडी संपल्यानं राऊत यांना ईडीनं आज पुन्हा न्यायालयात हजर केलं आणि राऊत चौकशीत सहकार्य करत नाहीत, असा आरोप केला. मात्र तपासात चांगली प्रगती झाली असून, येत्या सोमवारपर्यंत चौकशी पूर्ण करावी, असं न्यायालयानं सांगितलं.