भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केली विचारपूस

 

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या ITBP अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट दिली.

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या बस अपघातात जखमी झालेल्या आयटीबीपीच्या अर्थात भारत तिबेट सीमा पोलीस दलातल्या शूर जवानांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरला भेट दिली.

अमित शाह यांनी कॉन्स्टेबल (हवालदार /शिपाई)/जीडी बलवंत सिंग, कॉन्स्टेबल(हवालदार /शिपाई)/जीडी त्सेवांग दोरजे आणि कॉन्स्टेबल(हवालदार शिपाई) /जीडी बबलू कुमार यांची भेट घेतली आणि त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि त्यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या तीन गंभीर जखमी झालेल्या ITBP जवानांना काल विशेष एअर ॲम्बुलन्सने (हवाई रुग्णवाहिका) श्रीनगरहून नवी दिल्लीतील एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये हलवण्यात आले. येथील डॉक्‍टरांनी गृहमंत्र्यांना जवानांची प्रकृती आणि भविष्यात करावयाच्या वैद्यकीय प्रक्रियांची माहिती दिली. आयटीबीपीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गृहमंत्र्यांना जखमींच्या प्रकृतीची माहिती दिली.

16 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधील पहलगामजवळ झालेल्या भीषण बस अपघातात 7 जवान शहीद झाले आणि 32 जण जखमी झाले होते. बसमध्ये प्रवास करणारे भारत तिबेट पोलीस दलातले जवान आपले (ITBP) अमरनाथ यात्रेसाठी यशस्वीपणे कर्तव्य बजावल्यानंतर चंदनवाडी येथून परतत होते, त्यावेळी हा अपघात झाला. जखमी जवानांना त्याच दिवशी उपचारासाठी श्रीनगरला पाठवण्यात आले होते.