शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या याचिकांचर मंगळवारी सुनावणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या ठाकरे तसंच शिंदे गटानं दाखल केलेल्या विविध याचिकांचर सर्वोच्च न्यायालयात आज होणारी सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. त्रिसदस्यीय खंडपीठातले एक न्यायमूर्ती आज उपलब्ध नसल्यामुळे ही सुनावणी आता उद्या २३ तारखेला होईल, असं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे.

दरम्यान, इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरु असलेल्या ९२ नगरपरिषदांमध्ये आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारनं न्यायालयात पुर्नविचार याचिका दाखल केली आहे.