डॉ.मनसुख मांडवीय यांनी घेतला २०२२ -२३ या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि विक्रीच्या प्रगतीचा आढावा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय रसायन आणि खत मंत्री डॉ.मनसुख मांडवीय यांनी काल नवी दिल्ली इथं २०२२ -२३  या आर्थिक वर्षातील द्रव नॅनो युरिया उत्पादन आणि विक्रीच्या प्रगतीचा आढावा घेतला. नॅनो युरियाचे उत्पादन, पुरवठा योजना आणि शेतकरी आणि किरकोळ विक्रेत्यांपर्यंतची निर्यात वाढवण्याची खत विभागानं सुरू केलेल्या उपाययोजनांचाही त्यांनी आढावा यावेळी घेतला.

खत विभागाकडून राज्यांच्या मासिक पुरवठा योजनेत नॅनो युरियाचा समावेश केल्यानं त्याची उपलब्धता आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण अनेक पटींनी वाढेल असा विश्वास डॉ. मांडवीय यांनी यावेळी व्यक्त केला. नॅनो युरियाला मिशन मोडमध्ये प्रोत्साहन देण्याचे निर्देश देखील त्यांनी विभागातील अधिकाऱ्यांना यावेळी दिले. गेल्या वर्षी ऑगस्ट ते या वर्षी १० ऑगस्ट दरम्यान एकूण ३ कोटी २७ हजार बाटल्यांची विक्री झाल्याचं मंत्रालयानं अधोरेखित केलं.