देशाचे आगामी सरन्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती उदय लळित यांच्या नावाची शिफारस

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचे सरन्यायाधीश एन.व्ही. रामण्णा यांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती उदय उमेश लळीत यांच्या नावाची शिफारस केली आहे.  तसं त्यांनी कायदा आणि न्याय मंत्री किरेन रिजिजू यांना कळवलं आहे. न्यायमूर्ती एन.व्ही रामण्णा हे या महिन्यात सेवानिवृत्त होणार आहेत.