अतिवृष्टीमुळं झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक चंद्रपूर दौऱ्यावर

 

मुंबई (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात अतिवृष्टीमुळं चंद्रपुरात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक आज चंद्रपूर दौऱ्यावर आहे. जिल्ह्यातल्या वरोरा, भद्रावती, राजुरा तालुक्यातल्या पूरग्रस्त भागाला या पथकानं आज भेट दिली.

या पथकानं काल वर्ध्याचा दौरा केला होता. तर दुसरं पथक गडचिरोली दौऱ्यावर होतं. नागपुरात उद्या विभागीय आयुक्त कार्यालयात हे पथक अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे.