स्टार्टअप मानांकनात देश जगात तिसऱ्या, तर महाराष्ट्र देशात अव्वल श्रेणीत दाखल

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप परिसंस्था आणि युनिकॉर्नच्या संख्येच्या निकषांवर भारत आता जगात तिसऱ्या स्थानावर आहे. केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली. ते आज दिल्लीत डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमधे ‘डीएसटी स्टार्टअप उत्सव’ या कार्यक्रमात बोलत होते. भारतात सध्या १०५ युनिकॉर्न्स आहेत. त्यापैकी ४४ युनिकॉर्न्सची स्थापना २०२१ मधे, तर १९ युनिकॉर्न्सची स्थापना २०२२ मधे झाली आहे.

युनिकॉर्न म्हणजे १ अब्ज अमेरीकी डॉलर्स, म्हणजे ७ हजार ९०० कोटी रुपयांपेक्षा जास्त मुल्यांकन असलेली कंपनी. स्वातंत्र्याच्या ७५ व्या वर्षात स्टार्टअपची संख्या ७५ हजारावर गेली आहे. स्टार्टअप्स केवळ महानगरं किंवा मोठ्या शहरांमधेच नाहीत तर छोट्या शहरांमधे आहेत, असं त्यांनी सांगितलं.

स्टार्टअप रँकींग २०२१ मध्ये महाराष्ट्र राज्य टॉप परफॉर्मर श्रेणीमध्ये आलं आहे. देशातल्या १०५ युनिकॉर्नपैकी २४ युनिकॉर्न्स म्हणजे २३ टक्के युनिकॉर्न्स महाराष्ट्रातले आहेत. देशातल्या एकूण २ लाख १३ हजार स्टार्टअप्सपैकी ३६ हजार ८०० म्हणजे १८ टक्के स्टार्टअप्स महाराष्ट्रातले आहेत. राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात किमान २५ ते ३० स्टार्टअप्स असून, अगदी दुर्गम अशा गडचिरोली जिल्ह्यात ३२, तर नंदुरबार जिल्ह्यात ३७ स्टार्टअप्स आहेत. मुंबई महानगरात १४ हजार ७०० तर पुण्यात ८ हजार ६०० स्टार्टअप्स आहेत.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image