चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल- केंद्रीय अर्थमंत्री

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : चालू आणि पुढील आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ७.४ टक्के दराने वाढेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनं भारताचा विकास दर येत्या दोन वर्षांत सर्वात वेगवान राहण्याचा अंदाज व्यक्त केला असून त्यांचे अंदाज रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अंदाजाशी मिळतेजुळते आहेत, असं  मुंबईतल्या कार्यक्रमात बोलताना सीतारामन यांनी सांगितलं. भारत नवीन गुंतवणूक आकर्षित करत आहे. तथापि, जागतिक परिस्थिती अजूनही आव्हानात्मक असून सावधगिरी बाळगणं आवश्यक असल्याचंही त्या म्हणाल्या.