सुधारित फौजदारी प्रकिया कायदा आजपासून देशभरात लागू

 

मुंबई (वृत्तसंस्था) : सुधारित फौजदारी प्रकिया (ओळख) कायदा आजपासून देशभरात लागू झाला आहे. या कायद्यानुसार गुन्ह्याच्या तपासादरम्यान संशयित आरोपीची शारिरीक मोजमापं, बोटांचे ठसे इत्यादी वैयक्तिक माहिती घेऊन ओळख पटवण्याच्या उद्देशाने साठवून ठेवणं शक्य होणार आहे.

डोळ्यांचा पडदा, बाहुली यांच्या प्रतिमा, तसंच इतर शारिरीक तपशील आणि गरज पडल्यास त्याच्या विश्लेषण चाचण्यांचे अहवाल राष्ट्रीय फौजदारी नोंद ब्यूरोकडं जतन करता येतील. या माहितीचा उपयोग देशभरात कुठेही अन्यत्र गुन्हा घडल्यास त्या तपासात होऊ शकतो.