देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या लस मात्रांची संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत, खबरादारीची मात्रा घेतलेल्यांची संख्या १० कोटींच्या वर गेली आहे. आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २०५ कोटी ९७ लाखाच्या वर गेली आहे. त्यात ९३ कोटी ५१ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी लसीची दुसरी मात्रा, तर १० कोटी ३४ लाखापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लस मात्रा घेतली आहे.

राज्यात आज सकाळपासून ९६ हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आत्तापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १७ कोटी ४० लाखाच्या वर गेली आहे. त्यात ७ कोटी ५८ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी दुसरी मात्रा, तर सुमारे ६९ लाख १२ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी खबरदारीची लसमात्रा घेतली आहे.

Popular posts
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
बारावीच्या परीक्षांना उद्यापासून सुरुवात
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image