नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन लोकसभेत गदारोळ

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नॅशनल हेरॉल्ड वृत्तपत्राच्या कार्यालयावर सक्तवसुली संचालनालय - ईडीनं छापा टाकल्याच्या मुद्यावरुन काँग्रेस पक्ष सदस्यांनी आजही लोकसभेत गदारोळ केला. त्यामुळे सदनाचं कामकाज दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित झालं.

राज्यसभेत कामकाज सुरु होताच विरोधी पक्षांनी तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. विरोधकांवर दबाव टाकण्यासाठी सरकार तपास यंत्रणांचा वापर करत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. यावरुन गदारोळ झाल्यानं राज्यसभेचं कामकाज १२ वाजोपर्यंत स्थगित झालं होतं.