देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक - रिझर्व बँक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातल्या बँका प्रशासकीयदृष्ट्या सक्षम होत असल्या तरी सामाजिक दृष्टिकोनातून अधिक सुधारणा आवश्यक असल्याचं भारतीय रिझर्व बँकेच्या अभ्यास अहवालात म्हटलं आहे. भारतीय बँकांचं ‘प्रशासन, कार्यक्षमता आणि सुबोधता” याबाबत रिझर्व बँकेचा हा अहवाल असून गेल्या काही वर्षात भारतातल्या बँकांनी प्रशासकीय प्रमाणकांच पालन केलं असलं तरी सध्या मात्र याचा स्तर पुरेसा योग्य नसल्याचं या अहवालात म्हटलं आहे.

बँकांच्या दीर्घकालीन कार्यकाळात जोखीम टाळण्याकरता शाश्वत लाभाच्या उपाययोजनांना चालनादेणं आवश्यक असल्याचं या अहवालात म्हटलं आहे.  २००८-२००९ ते २०१२-२०१३ या कालावधीत भारतीय बँकिंग उद्योगाची स्थिती चांगली होती, मात्र २०१३-२०१४ नंतर यात मालमत्ता, गुणवत्ता आणि नफ्याच्या  दृष्टिकोनातून घसरण सुरू झाली असं या अहवालात म्हटलं आहे.