राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची अजित पवार यांची राज्यपालांकडे मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून खरीप पिकांना हेक्टरी ७५ हजार रुपये मदतीची मागणी, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे केली आहे. पवार यांच्या नेतृत्वात काल एका शिष्टमंडळानं मुंबईत राज्यपालांची भेट घेऊन या मागण्यांचं निवेदन सादर केलं.

मराठवाडा तसंच विदर्भात अतिवृष्टीमुळे नुकसान झालं असून, याची तातडीनं पाहणी करून नुकसानग्रस्तांना मदत देण्याची मागणी, या निवेदनात करण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा अद्याप विस्तार झालेला नसल्याकडेही या पत्रातून लक्ष वेधण्यात आलं आहे. राज्यपालांनी याबाबत मुख्यमंत्री तसंच उपमुख्यमंत्र्यांशी चर्चेचं आश्वासन दिल्याचं अजित पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image