स्वातंत्र्यदिनी अंतराळातही डौलाने फडकला तिरंगा ध्वज

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त काल स्वातंत्र्यदिनी अंतराळात तिरंगा ध्वज डौलाने फडकवण्यात आला. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रोने स्पेस कीड्झ इंडिया या संस्थेच्या सहकार्याने ही अभिमानास्पद कामगिरी केली .

पृथ्वीच्या वरती 30 किलोमीटर अंतरावर, अर्थात 1 लाख 6 हजार फूट उंचीवर हा तिरंगा एका छोट्या उपग्रहाद्वारे आणि बलूनच्या सहाय्याने  फडकवण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून आझादी का अमृत महोत्सव कार्यक्रमा अंतर्गत आणि हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत हा उपक्रम घेण्यात आला.

देशातील युवा पिढीमध्ये अंतराळ विज्ञानाबद्दल आकर्षण निर्माण व्हावं यासाठी स्पेस कीड्झ इंडिया ही संस्था कार्यरत असून नुकताच 75 ग्रामीण भागातील 750 युवतींनी तयार केलेला आझादी सॅट हा छोटा उपग्रह अवकाशात सोडण्यात आला आहे . 

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image