घुग्गुस इथल्या भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना तात्काळ 10 हजार रुपये दिले जातील - सुधीर मुनगंटीवार

 

मुंबई (वृत्तसंस्था) : चंद्रपूर जिल्ह्यात घुग्गुस इथल्या आमराई वॉर्डात झालेल्या भूस्खलनची घटना अतिशय गंभीर असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र परिसरातल्या इतर घरांनासुद्धा असा धोका राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. भूस्खलनाचा धोका असलेल्या घरांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तात्काळ 10 हजार रुपये दिले जातील, असं वनं आणि  सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज सांगितलं. घुग्गुस इथं भूस्खलन झालेल्या नामदेव मडावी यांच्या घराची पाहणी केल्यानंतर नागरिकांशी संवाद साधत त्यांनी नागरिकांना धीर दिला. सर्वतोपरी मदत केली जाईल, असंही  त्यांनी आश्वस्त केलं. तातडीची मदत म्हणून धोका असलेल्या कुटुंब प्रमुखांना प्रत्येकी तीन हजार रुपये त्वरित देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.