फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार - मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोनामुळं संकटात सापडलेल्या फेरीवाल्यांना प्रधानमंत्री स्वनिधी योजनेचा मोठा आधार मिळाल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केलं. ते स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवनिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या वतीनं डोंबिवलीमधल्या सावित्रीबाई फुले कलामंदिरात पथ विक्रेत्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या प्रधानमंत्री स्वनिधी महोत्सवात दुरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. या योजनेमुळं अनेक फेरी विक्रेत्यांचे संसार वाचले तसंच त्यांना पुन्हा स्वतःच्या पायावर ऊभं राहायला मदत झाली असल्याचं आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना सामावून घेत आणि सर्वांचं  हित जोपासत विकासाचं स्वप्न साकारण्याचं काम केलं असल्याचं शिंदे म्हणाले. स्वनिधी योजनेच्या माध्यमातून फेरीवाल्यांना आणि पथविक्रेत्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे प्रयत्न सुरु असून स्थानिक स्वराज्य संस्थांनीही त्यांना मदत करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं. 

Popular posts
कोल्हापुरातल्या गावित भगिनींच्या फाशीच्या शिक्षेचं जन्मठेपेत रुपांतर करण्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक
Image
कुपवाडा येथील भारत-पाक नियंत्रण रेषेजवळ शिवजयंतीचा सोहळा
Image
भ्रष्टाचार निर्मूलन आणि पारदर्शक प्रशासन याकरता सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
Image