प्रधानमंत्री, केंद्रीय क्रीडा मंत्री, यांनी केलं जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल नीरज चोप्राचं अभिनंदन

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेच्या ओरेगन इथं चालू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांनी नीरज चोप्राचं अभिनंदन केलं आहे. एका ट्विटमध्ये, श्री ठाकूर म्हणाले, नीरज चोप्राने आपल्या विजयाची दौड सुरु ठेवली असून, पुरुषांच्या भालाफेकमध्ये ८८ पूर्णांक १३ शतांश मीटरच्या त्याच्या सर्वोत्तम फेकीसाठी  आज त्यानं रौप्यपदक जिंकून इतिहास रचला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही नीरजचं अभिनंदन केलं असून, आपल्या ट्विट संदेशात मोदी म्हणतात की, आमच्या सर्वात प्रतिष्ठित खेळाडूंपैकी एक असलेल्या नीरज नं  मोठी कामगिरी केली असून, भारतीय खेळांसाठी हा विशेष क्षण असल्याचंही ते म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी नीरज चोप्रा यांना त्यांच्या आगामी प्रयत्त्नांसाठी शुभेच्छा दिल्या