दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे - रामदास आठवले

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दलित आणि सवर्णांमधला दुरावा काही प्रमाणात मिटला असून समाजात परिवर्तन होत आहे, असं रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. ते काल फलटण इथं दिवंगत पँथर नेते चंद्रकांत अहिवळे यांच्या आदरांजली सभेत बोलत होते.

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा समतेचा विचार सर्व विश्वानं स्वीकारला असून, देशातही आंबेडकरी विचार सर्व जाती-धर्मीयांना कळला आहे. समतेचा मानवतेचा विचार सवर्ण जातींना कळला असल्यामुळे पूर्वीसारखा तीव्र दलित- सवर्ण भेदभाव राहिला नाही, असे ते म्हणाले.