नीती आयोगानं प्रसिद्ध केलेल्या नवोन्मेष निर्देशांकात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नीती आयोगानं आज नवी दिल्लीत प्रसिद्ध केलेल्या innovation अर्थात नवोन्मेष निर्देशांकात मोठ्या राज्यांच्या श्रेणीत महाराष्ट्र चौथ्या स्थानी आहे.

पहिल्या तीन स्थानांवर कर्नाटक, तेलंगणा आणि हरियाणा ही राज्य आहेत. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी परमेश्वरन अय्यर यांनी हा निर्देशांक प्रसिद्ध केला.

ईशान्येकडील राज्यं आणि पर्वतीय राज्यांमध्ये मणिपूर तर केंद्र शासित प्रदेशांमध्ये चंडीगडनं पहिला क्रमांक पटकावला. जागतिक नवोन्मेष निर्देशांकाच्या आधारावर देशातल्या राज्यांच्या कामगिरीच्या आधारे ही क्रमवारी ठरवण्यात आली आहे. एकूण ६६ कसोट्यांच्या आधारे गुण देऊन ही क्रमवारी ठरवली जाते.