हवेली तहसील कार्यालयात विशेष लोकअदालत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या ६७ सातबारांबाबत निर्णय

 

पुणे : ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’ व १ ऑगस्ट महसूल दिनाच्या पार्श्वभूमीवर हवेली तहसील कार्यालयामध्ये विशेष लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सात-बारा संगणकीकरण अंतर्गत क्षेत्राचा मेळ बसत नसलेल्या अहवाल-१ मधील ६७ सात-बारांवर निर्णय घेऊन प्रकरणे निकाली काढण्यात आली.

हवेली तालुक्यामधील १ लाख ६२ हजार ६३० सात-बारांपैकी अहवाल १ चे म्हणजेच क्षेत्राचा मेळ बसत नाही असे १ हजार ८९६ सातबारे शिल्लक आहेत. क्षेत्राचा मेळ बसत नसल्यामुळे हे सातबारे खातेदारांना मिळू शकत नाहीत. त्या मधील प्रकरणांची छाननी करून सुनावणीस पात्र १०० प्रकरणांसाठी लोक अदालत आयोजित करण्यात आली. लोकअदालतीला चांगला प्रतिसाद मिळाला.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख व प्रांताधिकारी संजय आसवले यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल नायब तहसीलदार, कर्मचारी यांच्या सहकार्याने ही लोकअदालत आयोजित करण्यात आली.

Popular posts
एक्सपे.लाइफची मे महिन्यात डिजिटल पेमेंटद्वारे ६० हजार व्यवहारांची नोंद
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
न्यायालयात न टिकणारे आरक्षण देऊन मराठा समाजाची फसवणूक केल्याचा विजय वडेट्टीवार यांचा आरोप
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image