प्रधानमंत्र्याच्या हस्ते वाराणसीताल विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ तारखेला वाराणसीला भेट देणार आहेत. यावेळी १८०० कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांच्या कामाचे उद्घाटन तसंच पायाभरणी त्याच्या हस्ते होणार आहे.

तसंच रुद्राक्ष या आंतरराष्ट्रीय सहकार्य केंद्राला ते भेट देणार असून, यामध्ये नविन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर आयोजित अखिल भारतीय शिक्षा समागम या परिषदेचं उदघाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.