राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं - विनोद पाटील

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शिल्लक १२ टक्क्यांमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं, अशी मागणी मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केली आहे. ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते. सध्या राज्यात अनुसूचित जाती १३ टक्के, अनुसूचित जमाती सात टक्के, बाठिया आयोगानुसार इतर मागासवर्ग १८ टक्के, असं एकूण ३८ टक्के आरक्षण आहे.

आरक्षणाबाबत न्यायालयात विविध निर्णयात ५० टक्के मर्यादेचा उल्लेख करण्यात येतो, त्यामुळे उर्वरित १२ टक्क्यातून मराठा समाजाला ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता, आरक्षण देता येईल, असं पाटील म्हणाले.

Popular posts
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image