येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार- मुख्यमंत्री

 


मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज मुंबईतल्या रस्ते बांधणी आणि सुधारणा कामांचा आढावा घेतला, त्यानंतर ते बातमीदारांशी बोलत होते. पावसामुळे रस्त्यांवर झालेले खड्डे लवकरात लवकर भरून काढून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित राहील, याची दक्षता घेण्याची सूचना त्यांनी महानगरपालिका प्रशासनाला केली. सध्या मुंबईत २३६ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांचं काँक्रिटीकरणाचं काम सुरु आहे, तर ४०० किलोमीटरची कामं प्रस्तावित आहेत अशी माहिती मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुख्यमंत्र्यांना दिली. २०२३-२०२४ मध्ये आणखी ४२३ किलोमीटर अंतराच्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलं जाईल, असंही चहल यांनी या बैठकीत सांगितलं.