भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यात त्रिपक्षीय बैठक

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं काल भारत, फ्रान्स आणि संयुक्त अरब अमिरातीची त्रिपक्षीय बैठक झाली. तिन्ही देशांतर्फे इंडो-पॅसिफिक क्षेत्राच्या दृष्टीकोनांची देवाणघेवाण करण्यात आली. सागरी सुरक्षा, मानवतावादी सहकार्य आणि आपत्ती निवारण, ब्लू इकॉनॉमी, प्रादेशिक जोडणी, बहुपक्षीय मंचांमध्ये सहकार्य, ऊर्जा आणि अन्न सुरक्षा, नवोपक्रम आणि स्टार्टअप, पुरवठा यासह त्रिपक्षीय सहकार्य वाढवण्याच्या उपायांवर चर्चा आणि संभाव्य क्षेत्रांचा शोध घेण्यात आला. साखळी लवचिकता , सांस्कृतिक देवाणघेवाण आणि लोकांचं परस्परांशी  सहकार्य यावरही चर्चा झाली. भारताचं नेतृत्व विदेश मंत्रालयाचे सचिव संदीप चक्रवर्ती यांनी केलं.

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image