मनीलाँड्रिंग प्रकरणी सोनिया गांधी यांची आजही इडीमार्फत चौकशी

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मनीलाँड्रिंग प्रकरणी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांची आजही सक्तवसुली संचालनालयामार्फत चौकशी सुरु आहे. काल सहा तास त्यांची चौकशी झाली होती. नॅशनल हेरॉल्डची मालकी असलेल्या, काँग्रेस प्रणित यंग इंडियन प्राईव्हेट लिमिटेडमधल्या कथित वित्तीय अनियमितताबाबत सक्तवसुली संचालनालय तपास करत आहे. याप्रकरणी याआधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचीही संचालनालयाचं पाच दिवस चौकशी केली होती.