देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशींचे वितरण

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात आतापर्यंत १९९ कोटीपेक्षा जास्त लशीचे मात्रा देण्यात आल्या. केंद्रीय आरोग्य मंत्र्यालयानं सांगितलं की, देशात काल ११ लाख ७६ हजाराहून जास्त मात्रा देण्यात आल्या आहेत. समकालावधीत देशात काल २० हजार १३९ नवीन कोविडचे रुग्ण आढळले. देशात सध्या १ लाख ३६ हजार एक्टीव्ह रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर ९८ पूर्णांक ४९ शतांश टक्क्यावर आहे. देशात काल दिवसभरात एकूण १६ हजार ४८२ लोक बरे झाले असून, एकूण बरे होण्याचा आकडा चार कोटी ३० लाख २८ हजारांवर पोहोचला आहे. मंत्रालयाने सांगितले की साप्ताहिक सकारात्मकता दर ४ पूर्णांक ३७
शतांश टक्के आहे आणि दैनिक सकारात्मकता दर ३ पूर्णांक १० शतांश टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण ८६ कोटी ८१ लाख कोविड चाचण्या घेण्यात आल्या. गेल्या चोवीस तासांत तीन लाख ९४ हजारांहून अधिक चाचण्या घेण्यात आल्या.

 

 

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image