मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याविरुद्ध सीबीआयकडून गुन्हा दाखल

 


मुंबई (वृत्तसंस्था) : सीबीआयनं एक खासगी कंपनी, तिचे तत्कालीन संचालक आणि इतर अधिकारी, तसंच राष्ट्रीय शेयर बाजाराचे चार अधिकारी आणि इतर अज्ञातांविरुद्ध आज गुन्हा दाखल केला. यातील मुख्य आरोपींमध्ये मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, आणि NSE, अर्थात राष्ट्रीय शेअर बाजाराचे माजी व्यवस्थापकीय संचालक रवी नारायण आणि चित्रा रामकृष्ण यांचा समावेश आहे. २००९ ते २०१७ या कालावधीत NSE च्या उच्च व्यवस्थापनानं खाजगी कंपनीच्या संगनमतानंबेकायदेशीररित्या कर्मचार्‍यांचे फोन टेपिंग केल्याचा संदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशावरून ही कारवाई केली आहे. NSE च्या उच्च अधिकार्‍यांनी बेकायदेशीररित्या कर्मचार्‍यांचे फोन टेप केले, असा आरोप त्यांच्यावर आहे. या कॉल्सच्या ट्रान्स्क्रिप्ट्स खाजगी कंपनीने NSE च्या वरिष्ठ अधिकार्‍यांना पुरवल्या होत्या आणि यासाठी अंदाजे ४ कोटी ४५ लाख रुपये या खाजगी कंपनीला दिल,असाही आरोप आहे. सीबीआयनं आज संजय पांडे यांच्या घरावर आणि मुंबई, पुणे, कोटा, लखनौ आणि दिल्ली एनसीआर अशा देशभरातल्या १८ ठिकाणांवर छापे मारले. संजय पांडे घरातून बेपत्ता असून, सीबीआय शोध घेत आहे.

 

 

Popular posts
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image