भारत आणि वेस्ट इंडिज तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना पोर्ट ऑफ स्पेन इथं क्विन्स पार्कवर रंगणार

 


नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि वेस्ट इंडिज दरम्यान सुरु असलेल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथल्या क्विन्स पार्क मैदानावर खेळला जाणार आहे. या सामन्याचं नेतृत्व शिखर धवन हा भारतीय संघाचा आघाडीवीर  करणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना आज संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात रोमहर्षक विजय मिळवणारा  भारतीय संघ मालिकेत १-० नं आघाडीवर आहे. आज होणारा दुसरा सामनाही जिंकला तर भारतीय संघ वेस्ट इंडिज मध्ये झालेल्या सलग दोन, एकदिवसीय मालिका जिंकणारा संघ ठरणार आहे. या एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर या दोन संघांदरम्यान टी - २० च्या ५ सामन्यांची मालिकाही रंगणार आहे.