विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने ठोठवली ४ महिने तुरूंगवासाची शिक्षा

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक घोटाळ्यातील आरोपी प्रख्यात उद्योजक विजय माल्याला सर्वोच्च न्यायालयाने ४ महिने तुरूंगवासाची शिक्षा ठोठवली असून दोन हजार रूपये दंड भरण्याचा आदेश दिला आहे. २०१७ मधे दाखल झालेल्या न्यायालय अवमान प्रकरणात न्यायमुर्ती उदय लळित, न्यायमुर्ती एस रविंद्र भट आणि न्यायमुर्ती पी. एस. नरसिंह यांच्या पिठाने आज हा आदेश दिला.

२०१७ मधे विजय माल्याने न्यायालयाचा आदेश झुगारून आपल्या अपत्यांच्या खात्यात ४ कोटी डॉलर्स वळवले होते. हा व्यवहार न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. ९ हजार कोटी रूपयांचं बॅंक कर्ज बुडवल्याप्रकरणी विजय माल्या आरोपी आहे.