राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची ग्वाही

 

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही , अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस  यांनी दिली आहे. नागपूरच्या एनएलयू अर्थात राष्ट्रीय विधी  विद्यापीठाच्या वसतीगृह आणि इतर इमारतींचं  उद्घाटन आाज विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या हस्ते झालं.

यानंतर ते बोलत होते. कायद्याचं राज्य आणि न्याय प्रदान प्रक्रिया ही अंतिम व्यक्तीपर्यंत  पोहचली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. या कार्यक्रमाला केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी हेही उपस्थित होते. या विद्यापीठानं स्वतःच्या जबाबदारीवर तसंच शासनाच्या मदतीनं विद्यापीठाचं  विस्तारीकरण करून या विधी विद्यापीठाला जगातील श्रेष्ठ विधी विद्यापीठ बनवावं असे आवाहनही त्यांनी यावेळी  केलं.

याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती भूषण गवई यांनी विधी विद्यापीठाच्या आतापर्यंत झालेल्या विकासाचा आढावा घेतला.  याप्रसंगी   सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. नरसिम्हा, विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. विजेंदर कुमार प्रामुख्याने उपस्थित होते .

Popular posts
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारासाठी ३० जानेवारीपर्यंत अर्ज आमंत्रित
Image
एसटीच्या प्रवाशांना स्वस्त दरात “नाथजल” या शुद्ध पेयजल योजनेचं लोकार्पण
Image
चष्म्याच्या दुकानांना लॉकडाऊन मधून वगळा : आप्टीकल ट्रेडर्स असोसिएशनची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी
Image
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषदच्या वतीने संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांची जयंती, भक्ती शक्ती शिल्प निगडी येथे मोठ्या उत्साहात साजरी
Image
गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा मॉडेल राज्यात अग्रस्थानावर – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत
Image