महाविकास आघाडी सरकारने सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये ; विरोधी पक्षांची मागणी

 

मुंबई (वृत्तसंस्था) : महाविकास आघाडी सरकारने राज्यात सुरु केलेल्या विकासकामांना स्थगिती देऊ नये अशी मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानभवनात भेट घेतली.

अनेक जिल्ह्यात अतिवृष्टी, पूरस्थितीने नुकसान झालेल्या शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना नुकसान भरपाई तसंच अन्य मदतीचे तातडीने देण्यात यावी, आदी मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. अतिवृष्टीनं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना १0 लाखाची मदत द्यावी, पावसामुळं नुकसान झालेल्या जिरायती शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ५0 हजार रुपये आणि बागायती शेतकऱ्यांना १ लाख रुपयाची प्राथमिक मदत देण्याची मागणी काँग्रेसनं आज मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन केली. 

Popular posts
उच्चतर शिक्षा अभियानात महाराष्ट्रातल्या ४ विद्यापीठांना निधी मंजूर
Image
‘लाडकी बहीण योजने’अंतर्गत लाभार्थी महिलांकडून रक्कम परत जमा करण्याबाबत शासनाकडून सक्ती नाही – महिला व बालविकास विभागाचे स्पष्टीकरण
Image
तरुणांनी यशासाठी भव्य शक्यतांच्या अवकाशाचा शोध घेतला पाहिजे - उपराष्ट्रपती
Image
पश्चिम बंगालच्या संदेशखाली भागातल्या महिला अत्याचाराच्या घटनेचा अनुराग ठाकूर यांनी केला निषेध
Image
अंदमान निकोबार बेटं भारताला आग्नेय आशियाबरोबर जोडणारा दुवा
Image