हर घर तिरंगा मोहिमेवर कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी खर्च करण्याचे केंद्र सरकारचे खाजगी कंपन्याना निर्देश

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : खाजगी कंपन्या त्यांचा कॉर्पोरेट सामाजिक दायित्व निधी म्हणजे CSR निधी हर घर तिरंगा मोहिमेशी संबंधित कार्यक्रमांसाठी खर्च करू शकतात, असं कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे.

काल जारी केलेल्या परिपत्रकात मंत्रालयानं स्पष्ट केलं की या मोहिमेशी संबंधित कृतींसाठी जसे की राष्ट्रध्वजांची निर्मिती, पुरवठा, ध्वज पोचवणे, इत्यादी संबंधित गोष्टींसाठी कंपन्या हा निधी खर्च करु शकतात. या संबंधित सूचना कंपनी कायद्याच्या अनुसूची ७ अंतर्गत देण्यात आल्या आहेत. 

परिपत्रकात असंही म्हटलं आहे की कंपनी नियम २०१४ नुसार संबंधित परिपत्रके किंवा मंत्रालयानं जारी केलेल्या स्पष्टीकरणांच्या पूर्ततेच्या अधीन राहून ही कामं करू शकतात. भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या निमित्तानं लोकांना राष्ट्रध्वज घरी आणण्यासाठी आणि तो फडकावण्यासाठी प्रोत्साहित करणे, आझादी का अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून सरकारद्वारे हर घर तिरंगा मोहीम आयोजित केली आहे.